आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:महापालिकेमध्ये आयुक्त भेटेना अन‌् कर्मचारीही जागेवर दिसेना

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेचे आयुक्त देविदास पवार हे आैरंगाबाद येथील न्यायालयीन कामकाजासाठी पाच दिवसांपासून रवाना झाले आहेत. त्यामुळे समस्या एेकण्यासाठी महापालिकेत एकही वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्याची ओरड आहे. आयुक्त नाही म्हटल्यावर विभागांमधील कर्मचारी संख्या देखिल घटली आहे. दाेन दिवस सुटी असताना शुक्रवारपासून कर्मचारी सुटीच्या मुडमध्ये असल्याचे वातावरण शुक्रवारी दुपारी दिसले. महापालिकेच्या आयुक्तपदावरून निर्माण झालेला घाेळ महिना उलटला तरी संपलेला नाही. मॅट काेर्टात तारीखे मागून तारखा जात आहेत. निर्णय लागेपर्यंत धाेरणात्मक निर्णय न घेण्याचे मॅटचे आदेश आहेत; परंतु आयुक्त पवारांकडून साेईच्या विषयांनाच हात घातला जात असल्याची कुजबूज पालिकेच्या वर्तुळात आहे.

बातम्या आणखी आहेत...