आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा:मनपाच्या चार कोटींच्या निधीला मंत्रालयात कात्री, 42 ऐवजी 38 कोटींनाच मंजुरी; भाववाढ नामंजूर

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल वीस वर्षांनंतर शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांचे डांबरीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे जळगावकरांमध्येही प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. नगरविकास मंत्र्यांनी स्थगिती उठवल्यानंतर शासनाकडून महापालिकेला आदेश प्राप्त झाले. मनपाने सादर केलेल्या प्रस्तावातील आकस्मिक खर्च व भाववाढ नाकारत ३८ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

तीन वर्षांपासून केवळ घोषणा, मंजुरी, कामाचे नियोजन या चक्रात फिरत असलेल्या ४२ कोटींच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४२ कोटींच्या निधी खर्चावरील स्थगिती उठवली. त्यामुळे या निधीतून शहरातील ४९ प्रमुख रस्त्यांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. आता केवळ कामे सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून कामांच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

मनपाचे पीडब्ल्यूडीला पत्र
शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने पत्र रवाना केले आहे. यात शहरातील रस्त्यांची निकड लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या नियंत्रणात मक्तेदाराकडून तातडीने रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करावी, असे पत्रात नमूद केल्याचे सांगण्यात आले.

वाढीव खर्चाला राज्य शासनाने दिला नकार
महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत ४१ कोटी ९५ लाख रुपयांच्या मर्यादेत तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावातील आकस्मिक खर्चाची १ कोटी ६६ लाख ७६ हजार रुपये व भाववाढीचे २ कोटी ४९ हजार रुपये हे घटक महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत प्रकल्पांसाठी अनुज्ञेय नसल्याने ते वगळून उर्वरित ३८ कोटी २८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...