आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएचआर घाेटाळा:अवसायक जितेंद्र कंडारेचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील ७ राज्यांमध्ये २५० पेक्षा जादा शाखांचा विस्तार असलेल्या जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात ‘बीएचआर’ या नावाजलेल्या पतसंस्थेत संचालक मंडळाच्या नियमबाह्य आणि अनियमित व्यवहारांमुळे सुमारे ८०० काेटींचा अपहाराचा घाेटाळा उघडकीस आला आहे. या घेाटाळ्यात अटकेतील संशयित अवसायक जितेंद्र गुलाबराव कंडारे याने जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असता न्यायालयाने ताे फेटाळला. त्यामुळे कंडारे याचा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे.

बीएचआर पतसंस्था अवसायनात नोव्हेंबर २०१५ मध्ये तत्कालीन सरकारने जितेंद्र कंडारे याची अवसायक म्हणून नियुक्ती केली होती. पतसंस्थेने वाटलेल्या कर्जाची वसुली करून ठेवीदारांच्या सुमारे ८०० कोटी रुपयांच्या ठेवी परत करायच्या होत्या. मात्र, जप्त केलेल्या कर्जदारांच्या मालमत्ता लिलाव प्रक्रिया राबवून त्यातून येणाऱ्या सुमारे ९०० कोटी रुपयांच्या उत्पन्नातून पतसंस्थेला अवसायनातून बाहेर काढणे आवश्यक हाेते. परंतु, अवसायक कंडारे याने संशयितशी संगनमत करून मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुणे येथील शिक्रापूर पेालिस ठाण्यात व रज्यभरात ठिकठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. आर्थिक गुन्हा शाेध पथकाने सापळे रचून ठिकठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले हाेते. यामध्ये प्रकाश जगन्नाथ वाणी, सुनील देवकीनंदन झंवर, रा. सुहास कॉलनी, जळगाव, महावीर माणिकचंद जैन, अजय नंदलाल राठी, आदिनाथ निवास कोटवळ टिळकवाडी, नाशिक व विवेक देविदास ठाकरे रा.महाबळ काॅलनी, जळगाव,अजय ललवाणी, उदय कांकरीया भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे ऑडिट करणारे धरम सांकला यांना टप्पयाटप्यान अटक केली हाेती. यामध्ये गुलाबराव कंडारे यांच्याविरोधात व इतर आरोपीविरोधात पुरावा झाल्याने त्यांचेविरोधात २२ मार्च २०२२ रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...