आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगाराला पायी फिरवले:पोलिसांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराला पायी फिरवले; जुबेरची दहशत कमी करण्यासाठी पायी फिरवले

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारहाणीच्या गुन्ह्यातील संशयित जुबेर उर्फ डबल भिकन शेख याला ३० मार्च रोजी मध्यरात्री पकडण्यासाठी गेलेल्या शहर ठाण्याच्या पोलिसांच्या अंगावर त्याने सिलिंडर फेकले. त्याच्या आईने पोलिस कर्मचाऱ्याला चावा घेतला.

दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक करून पोलिस कोठडी घेतली. जुबेरची दहशत कमी करण्यासाठी गेंदालाल मिल परिसरात शुक्रवारी जुबेरला रस्त्यावरून पायी फिरवले.

या वेळी पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, नरेंद्र ठाकरे, प्रणेश ठाकूर, रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंधाटे, योगेश पाटील, राजकुमार चव्हाण उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...