आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक वर्ष 20233-24:पुस्तकातील बदलाचा निर्णय त्वरित फिरवला

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाठ्यपुस्तके व वह्यांचे वाढते ओझे कमी करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जूनपासून अर्थात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात पाठ्यपुस्तकातच वह्यांची कोरी पाने समाविष्ट करण्यात येणार आहेत. तिसरी ते दहावीपर्यंत हा निर्णय लागू करण्यात आला आहे. मात्र, नववी व दहावीच्या पुस्तकात बदल करता येणार नसल्याने या निर्णयात बदल करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी शुक्रवारी संकेतस्थळावरून हा शासन निर्णय हटवण्यात आला आहे.

एकीकडे मुलांचे दप्तराचे ओझे वाढत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण-वंचित समूहातील मुलांना लिखाणाचे साहित्य उपलब्ध होत नाही. या दोन प्रतिकूल परिस्थितीवर उपाययोजना म्हणून पाठ्यपुस्तकात वह्यांची पाने छापण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. तिसरीपासून दहावीपर्यंतची पुस्तके अशाच प्रकारे छापण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र, हा आदेश संकेतस्थळावरून रद्द करण्यात आल्याने सुधारित आदेश येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...