आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढापा तुटला:निकृष्ट सिमेंट गळून पडल्याने ढापा तुटला

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंप्राळ्यातील अष्टभुजानगरात गटारीवर टाकण्यात आलेला ढापा दाेन वर्षांतच तुटला आहे. ढाप्यावरील निकृष्ट सिमेंट गळून पडल्याने ढाप्याच्या सळईंचा केवळ सापळा उभा आहे. ढाप्यावरील लाेखंडी सळया उघड्या पडल्या आहेत. त्यात वाहने रुतून अपघात हाेत असल्याची स्थिती आहे. अवघ्या दाेन वर्षांत ढापा तुटल्याने कामाची गुणवत्ता चव्हाट्यावर आली आहे.

काेराेनापूर्वीच अष्टभुजानगरात गटारीसाेबत बांधण्यात आलेल्या गटारीवरील ढापा गेल्या तीन महिन्यांपासून तुटला आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर या ढाप्याची वेळेत डागडुजी केली असती तर येथे हाेणारे अपघात टाळता आले असते. दरम्यान, ठेकेदारांकडून निकृष्ट मटेरिअल वापरून ढापे तुटण्याची व्यवस्था केली जाते, असा आराेप नागरिकांकडून केला जाताे आहे.

या परिसरात गटारीवर अन्य ठिकाणी टाकण्यात आलेल्या ढाप्यावरील सळया उघडल्या पडल्याने त्या ठिकाणचे ढापेही असेच तुटण्याची भीती व्यक्त हाेत आहे. दरम्यान, संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी हाेत आहे. ढापे बांधताना सिमेंटचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे सळई सिमेंट धरून ठेवत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी ढाप्यावरील सळई वर येण्याचे प्रमाण वाढले आहे. ढापे बांधतानातच ते काम पुन्हा मिळावे, अशी व्यवस्था केली जात असल्याचा आराेप भाजपचे महानगर प्रमुख दीपक सूर्यवंशी यांनी ‘दिव्य मराठी’च्या रुबरू या उपक्रमात केला हाेता. दरम्यान, अशा कंत्राटदारांना शाेधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापाैर जयश्री महाजन यांनी दिला हाेता. त्यानंतर अजूनही कारवाई झालेली नाही

बातम्या आणखी आहेत...