आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरळक पाऊस:जिल्ह्यातही सोमवारपासून तुरळक पाऊस शक्य, तापमान 40 अंशांवर ; सायंकाळी आकाशात ढगांची दाटी

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गुरुवारी वादळी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारीही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावूनही जिल्ह्यात तापमान चाळीशीवरच आहे. जळगावात ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शुक्रवारी झाली. सायंकाळी आकाशात ढगांची दाटी झाली. राज्यात शुक्रवारी कोकणमार्गे मान्सूनचे आगमन झाले. सोबतच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांत सातपुडा पर्वतरांगा आणि पायथ्याशी वादळी पावसाने धडक दिली. जिल्ह्यात अन्य तालुक्यांत तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या सोमवारपर्यंत जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र, या पावसामुळे तापमान कमी झालेले नाही. येत्या आठवड्यात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवली गेली.

बातम्या आणखी आहेत...