आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर:जिल्हा रुग्णालयाला मिळेल निवासी डॉक्टर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने राज्यातील सर्व वैद्यकिय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना जिल्हा निवासी कार्यक्रम बंधनकारक केले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालययांना निवासी डॉक्टर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्व निवासी डॉक्टरांसाठी बंधनकारक असेल. क्लिनिकल आणि पॅरा क्लिनिकल विभागातील डॉक्टर थेट रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत असतील तर नॉन क्लिनिकल विषयांच्या डॉक्टरांना कशा पद्धतीने काम द्यावे हे अद्याप निश्चित नाही.

जिल्हा रुग्णालयांत गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने दोन वर्षांपूर्वी देशभरातील सर्व वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांच्या तीन वर्षात अभ्यासकाळात तीन महिने जिल्हा रुग्णालयात काम करावे लागेल असे निर्देश देणारे परिपत्रक जारी केले होते. जिल्हा निवासी कार्यक्रम असे या उपक्रमाचे नाव आहे. कोरोनामुळे या उपक्रमाची अंमलबजावणी झालेली नव्हती. या वर्षापासून मात्र त्याची अंमलबजावणी होणार आहे.पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या निवासी डॉक्टरांना रोटेशन पद्धतीने ही सेवा देता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...