आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दूध संघाच्या चेअरमन तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंसह राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले. तथापि, भाजप व शिंदेसेना पुरस्कृत शेतकरी पॅनलने १५ जागा मिळवत विजय मिळवला. खडसेंच्या राष्ट्रवादी पॅनलला केवळ चार जागा राखता आल्या.
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील याच्या शेतकरी पॅनल विरुद्ध माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलमध्ये हा सामना रंगला. विद्यमान चेअरमन मंदाकिनी खडसे यांचा ७६ मतांनी पराभव करत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विजय मिळवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.