आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफलातून कारभार:उद्घाटनपुर्वी इमारतीचे दरवाजे, खिडक्या, पंखे गेले चोरीला; प्रशासनाला अजूनही गांभीर्य नाही

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहराजवळ गिरणा पंपीग रोडवर राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ मिशनतंर्गत (एनआरएचएम) ६५ लाख रूपये खर्चून एक भव्य इमारत बांधण्यात आली आहे. कोरोना काळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागालाऔषधसाठ्यासाठी ही इमारत हस्तांतरित करण्यात आली आहे. परंतु, गावाबाहेर जाणे गैरसोयीचे असल्याने या विभागाने तेथे जाण्याएेवजी शहरातील एका शाळेत भाड्याने कार्यालय थाटले आहे. इमारतीची प्रत्यक्ष मालकी घेण्यास कोणीच पुढे येत नसल्याने ही भव्य इमारत चोरट्यांचे शासकीय आश्रयस्थान बनली आहे.

जिल्हा परिषदेची शहराला लागून सावखेडा शिवारात २० हजार चौरस फुट जागा आहे. त्यापैकी ३ हजार चौरस फुट जागेवर एनआरएचएम अंतर्गत इमारत बांधण्यात आली आहे. त्यासाठी २०१९-२० या वर्षात ६५ लाख रूपये खर्च झाले आहेत. इमारत बांधून झाल्यानंतर लस ठेवण्यासाठी आरोग्य विभागाला ही इमारत हस्तांतर केली आहे. ही इमारत जिल्हा परिषदेच्याऔषध निर्माण विभागालाऔषधाचा साठा करण्यासाठी हस्तांतरित केल्याचा दावा एनआरएचएमकडून केला जातो आहे. या नवीन वास्तूचे उद्घाटन होण्यापुर्वीच ही इमारत शासकीय विभागांमुळे भग्नावस्थेत आहे. ही इमारत कोणत्या विभागाची याचीही माहिती या परिसरातील नागरीकांना नाही हेही विशेष होय.

शासकीय विभागांना मालकी नको, ताब्याबाबतही संभ्रम
एनआरएचएम विभागाने ही इमारत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागालाऔषधसाठ्यासाठी हस्तांतरित केल्याचा दावा या विभागाचे अधिकारी हरिचंद्र पवार यांनी केला आहे. दरम्यान, ही इमारत गैरसोयीची असून तेथे चोरट्यांची भीती आहे. रेल्वेपुलामुळेऔषधांची वाहने जावू शकत नाहीत. त्यामुळे मी इमारतीचा ताबा घेतला नाही. ती इमारत कोणाच्या मालकीची आहे हे माहिती नसल्याचा दावाऔषध निर्माता रवींद्र पाटील यांनी दिव्य मराठीशी बोलतांना केला. दोन्ही विभागांनी ताबा आपल्याकडे नसल्याचा दावा केला. त्यामुळे संभ्रम वाढला आहे.

इमारतीचे साहित्य चोरीला
इमारत उद्घाटन होण्यापुर्वी भग्नावस्थेत गेली आहे. इमारतीचा वापरच न झाल्याने तेथील मुख्य गेट, दरवाजे, खिडक्या, पंखे, नळ, फिटींग हे साहित्य चोरी गेले आहे. फरशी आणि पेव्हर ब्लॉक काढण्याचा प्रयत्न झाला आहे.

भाड्याच्या जागेत उघड्यावर ठेवलीऔषधी
जिल्हाभरातील आरोग्य केंद्रासाठी येणारीऔषधेऔैषधनिर्माण विभागाच्या स्टोअरमध्ये साठवली जातात. शहरातील महापालिकेची बंद पडलेली शाळा क्रमांक २८ सोनीबाई श्रीकिसन दायमा प्राथमिक विद्यालयातऔषधसाठा आहे. तेथे पुरेशी जागा नसल्याने सर्वऔषधसाठा हा शाळेच्या व्हारांड्यात उघड्यावर पडून आहे.

अधिकाऱ्यांचे झाले दुर्लक्ष
एनआरएचएमच्या इमारतीत दगडी चूल मांडून मटण पार्ट्या झोडल्या जात असल्याचे ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत समोर आले. साहित्य चोरीला गेलेले असले तरी या संदर्भात संबंधित विभाग अजूनही जागा झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...