आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण:माेकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरणास लागणार तीन वर्षांचा कालावधी

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात १५ हजार माेकाट कुत्र्यांची संख्या हाेती. गेल्या पाच वर्षात त्यात आणखी वाढ हाेवून २० हजारापर्यंत आकडा गेला. गेल्या वर्षभरात आतापर्यंत सुमारे पाच हजार माेकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्वच कुत्र्यांवर शस्त्रक्रीयेसाठी आणखी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागेल. दरम्यान, महापालिकेने स्थगिती दिल्यानंतर माेकाट कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्यासाठी मनपावर दबाव वाढवण्यात आला आहे.शहरातील माेकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर हाेत चालला आहे. मनपा क्षेत्रात सन २०१४-१५मधील आकडेवारीनुसार माेकाट कुत्र्यांची संख्या चाैदा ते पंधरा हजार हाेती. माेकाट कुत्र्यांचा बंदाेबस्तासाठी जिल्ह्यात एकही एबीडब्लूबीआय अंतर्गत मान्यताप्राप्त संस्था नाही.

बातम्या आणखी आहेत...