आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान:उत्तरेतील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव;  तापमान 43 अंशांवर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जूनच्या पहिल्याच पंधरवड्यात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या जळगावकरांना पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. रविवारी जळगावात उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. शनिवारच्या तुलनेत २ अंशांनी तापमान वाढल्याने दिवसभर उष्णतेच्या झळांनी हैराण केलेहोते. उत्तरेत आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीसह उत्तरेतील राज्यांत तापमान ४५ अंशांपर्यंत वाढले आहे.

मान्सून दक्षिणेतून पुढे आगेकूच करत असताना उत्तरेत मात्र उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसला असून, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात पुन्हा उष्णता वाढली आहे. रविवारी जळगावात ४३ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. पंधरवड्यात पुन्हा तापमान वाढले : मे महिन्यात ४५ अंशांवर गेलेले तापमान १६ मे रaजी ४३ अंशांपर्यंत खाली आलेहोते. त्यानंतर तापमानात घटहोऊन पारा ४० अंशांखाली आलाहोता. जून महिन्यात त्यात पुन्हा वाढ झाली असून, रविवारी ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

बातम्या आणखी आहेत...