आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध संघ निवडणुक:निवडणुकीचा बिगुल वाजला; दूध संघासाठी 23 जूनपर्यंत मतदारांचे ठराव मागवले

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात मात्र मतदार संस्थाची यादी आणि या संस्थांकडून ठराव मागवण्यात आले आहेत. येत्या २५ मे ते २३ जून या काळात संस्थांनी उपनिबंधकांकडे ठराव पाठवावे असे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक सुरेंद्र तांबे यांनी काढले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये मुदत संपलेल्या जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालक मंडळाला दीड वर्षापासून मुदतवाढ मिळालेली आहे. निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जुलै-ऑगस्ट महिन्यात दूध संघाची निवडणूक घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार सहकारी संस्था (दुग्ध) चे उपनिबंधक सुरेंद्र तांबे यांनी दूध संघाला पत्र देऊन मतदानासाठी पात्र असलेल्या संस्थांची यादी मागवली आहे. अशा पात्र संस्थासाठी ३१ मार्च २०१९ ही तारीख निश्चित केली आहे. या तारखेला पात्र संस्थेकडून ठराव मागवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...