आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिष्कार‎:परीक्षांच्या कामावर कर्मचाऱ्यानी टाकला बहिष्कार‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अकृषी विद्यापीठीय व‎ संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर‎ कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित‎ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य‎ महाविद्यालयीन व विद्यापीठीय‎ सेवक संयुक्त समितीतर्फे २‎ फेब्रुवारीपासून राज्यातील अकृषी‎ विद्यापीठे व संलग्नित‎ महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या‎ सर्व परीक्षांच्या कामकाजावर‎ बहिष्कार टाकून आंदोलनाची‎ सुरुवात केली आहे.

यात कवयित्री‎ बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र‎ विद्यापीठातील शंभराहून अधिक‎ कर्मचारी सहभागी झाले आहे.‎ राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे‎ व संलग्नित महाविद्यालयातील‎ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या‎ वेतन आयोगातील वेतनश्रेणी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आधारभूत मानून सातवा वेतन‎ आयोग लागू करावा यांसह‎ आश्वासित प्रगती योजनेची‎ अंमलबजावणी यांसारख्या विविध‎ मागण्यांबाबत अनेकदा निवेदने‎ देऊनही शासनाने लक्ष दिले नाही.‎

या मागण्या पूर्ण करण्यासाठी‎ महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व‎ विद्यापीठीय सेवक संयुक्त‎ समितीतर्फे २ फेब्रुवारीपासून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ राज्यातील अकृषी विद्यापीठे व‎ संलग्नित महाविद्यालयीनस्तरावर‎ होणाऱ्या सर्व परीक्षांच्या‎ कामकाजावर बहिष्कार टाकून‎ आंदोलनाची सुरुवात केली आहे.‎ विद्यापीठातील दोन्ही घटक‎ संघटनांनी पुकारलेल्या‎ आंदोलनामुळे परीक्षेचे संपूर्ण काम‎ ठप्प झालेले आहे.

संघटनांचे‎ पदाधिकारी यांनी गुरुवारी कुलगुरू‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी व‎ संचालक, परीक्षा व मूल्यमापन‎ मंडळ प्रा. डॉ. दीपक दलाल यांची‎ भेट घेऊन आंदोलनाविषयी कल्पना‎ देण्यात आली. सध्या विविध‎ स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या ज्या‎ विद्यार्थ्यांच्या परीक्षा राहिल्या होत्या‎ अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू‎ असून आंदोलनामुळे या परीक्षेला‎ अडचणी निर्माण झाल्या आहे.‎

बातम्या आणखी आहेत...