आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवासेना जळगाव महानगर व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान काव्यरत्नावली चौकात धूलिवंदन जल्लोषात साजरे करण्यात आले. या वेळी पारंपरिक वाद्य, डीजे, स्टॅण्डअप कॉमेडी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुलींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याने त्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना सहसचिव विराज कावडिया, युवासेना महानगर युवाधिकारी विशाल वाणी, स्वप्निल परदेशी, चेतन कापसे, हितेश ठाकरे, यश सपकाळे, प्रीतम शिंदे, अमित जगताप, भूषण सोनवणे, शंतनू नारखेडे, प्रशांत वाणी, संकेत कापसे, यश लोढा, अमोल सोनवणे, मनजीत जांगीड, पीयूष हसवाल, पवन चव्हाण, तेजस दुसाने आदी उपस्थित होते.
उडानतर्फे नैसर्गिक रंगांची उधळण
कोरोनाच्या सावटाखाली गेल्या दोन वर्षांपासून घरात अडकून असलेल्या दिव्यांग मुलांनी धूलिवंदन नैसर्गिक रंग उधळत साजरी केले. उडान फाउंडेशनतर्फे जळगावात दिव्यांग मुला-मुलींनी धूलिवंदन साजरे करीत आनंद साजरा केला. नैसर्गिक रंगांची उधळण करत एकमेकांना रंग लावत विद्यार्थ्यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या. मराठी-हिंदी गाण्यांच्या तालावर ठेका धरत विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, विनोद शिरसाळे, प्रवीण चौधरी, अजय तळेले, धनराज कासट, हेमांगी तळेले, चेतन वाणी, तुषार भांबरे, रजत भोळे, सोनाली भोई, जयश्री पटेल, हेतल वाणी, गायत्री भांबरे, चिन्मय जगताप, अक्षद बेंद्रे उपस्थित होते.
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे होळी पूजन, धूलिवंदन
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे होळीनिमित्त गुरुवारी नेहरू चौकात महापालिकेजवळ होळीची पूजा करून भाविकांनी वंदन केले. त्यानंतर उपस्थित नागरिकांच्या हातून होळी पेटवण्यात आली. शुक्रवारी धूलिवंदनानिमित्त तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात एकच जल्लोष केला. या वेळी आमदार सुरेश भोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जेडीसीसी बँकेचे संचालक श्यामकांत सोनवणे, नेहरू चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अजय गांधी, युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी पीयूष गांधी, कार्यकर्ते व इतर तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवासेना जळगाव महानगर व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे काव्यरत्नावली चौकात आयोजित करण्यात आलेल्या धूलिवंदनाच्या कार्यक्रमात पारंपरिक वाद्य, डीजेच्या तालावर जल्लोषात नाचताना तरुणाई.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.