आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट‎ करमुक्त करावा, भारतीय जनता युवा‎ मोर्चाने दिले निवेदन

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

द कश्मीर फाइल्स हा सिनेमा‎ सोशल मीडियावर सध्या चर्चेत‎ आहे. हा चित्रपट महाराष्ट्र सरकारने‎ करमुक्त करावे या संदर्भात‎ युवासेना जळगाव महानगरतर्फे‎ अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन‎ यांना निवेदन देण्यात आले. या वेळी‎ युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव‎ विराज कावडिया, युवासेना जिल्हा‎ युवाधिकारी शिवराज पाटील,‎ महानगर युवाधिकारी स्वप्निल‎ परदेशी, विशाल वाणी, उपमहानगर‎ युवाधिकारी यश सपकाळे, हितेश‎ ठाकरे, गिरीश सपकाळे, विभाग‎ युवाधिकारी चेतन कापसे, अमोल‎ मोरे, युवा सैनिक अमित जगताप,‎ शंतनू नारखेडे, प्रीतम शिंदे व‎ युवासेना जळगाव महानगरचे‎ पदाधिकारी उपस्थित होते.‎

जम्मू व कश्मीरमध्ये दहशतवादाचे‎ चित्रण करणारा ‘द कश्मीर‎ फाइल्स’ हा चित्रपट राज्यात टॅक्स‎ फ्री करावा अशी मागणी भारतीय‎ जनता युवा मोर्चाचे महानगर‎ जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांनी‎ केली आहे. महाराष्ट्रातील जनतेने‎ अधिकाधिक चित्रपट पहावा‎ यासाठी करमुक्त करण्याची‎ मागणी केली आहे. यासंदर्भात‎ जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन‎ देण्यात आले आहे. युवा मोर्चा‎ सरचिटणीस जितेंद्र चौथे, मिलिंद‎ चौधरी, अक्षय जेजुरकर, महेश‎ पाटील, उपाध्यक्ष गणेश महाजन,‎ राहुल लोखंडे, राहुल मिस्तरी,‎ सचिन बाविस्कर, स्वामी पोतदार‎ आदींनी निवेदन दिले.‎

बातम्या आणखी आहेत...