आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवापूर:नवापूर शहरात पहिला कोरोना पॉझिटिव पेशंट सापडला, दोन दिवस शहर अत्यावश्‍यक सेवा सोडून बंद

नवापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

नवापूर शहरातील मंगलदास पार्क मधील ६५ वर्षीय महिलेचा अहवाल आज दुपारी कोरोना पॉझिटिव्ह आला. प्रशासनाने पाचशे मीटरचा परिसर सील केला आहे. सदर महिला नऊ दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. परिवारातील अकरा सदस्यांना अद्याप कुठल्याही प्रकारची लक्षणं नसली तरी खबरदारी म्हणून क्वारोंटाइन कक्षात ठेवण्यात आले आहे. यामुळे शहर दोन दिवस बंद ठेवण्यात आले असून मंगलदास पार्क परिसर चौदा दिवस कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. 

आज दुपारी चारच्या सुमारास नवापूर शहरातील ६५ महिलेचा कोरोना अहवाल पुण्याहून पॉझिटिव्ह आला. अहवाल प्राप्त होताच गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत वसावे, पालिकेचे अनिल सोनार,मिलिंद भामरे, सर्व प्रशासकीय टीम घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार सुनीता जर्हाड सायंकाळी घटनास्थळी आल्या. मंगलदास पार्क मधील बाधित व्यक्ती च्या घरापासून पाचशे मीटरचा परिसर सील करण्यात आला. चौदा दिवस कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला असून कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. 

धुळे येथील कोरोना तपासणी करणारी लॅब बंद पडल्याने नऊ दिवस उशिराने अहवाल आला 

शहरातील मंगलदास पार्क मध्ये वरखेडी (ता. भडगांव जि.जळगाव) मार्गे  कोरोनाचा शिरकाव झाला. तब्बल नऊ दिवसांनी कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अंत्यसंस्काराला गेलेली ६५ महिला कोरोना बाधित व्यक्ती च्या संपर्कात आल्याने कोरोना विषाणूची लागण झाली. या घटनेला आज चौदा दिवस झाले. २० जूनला संशयीत व्यक्ती वरखेडी (ता. भडगांव जि.जळगाव) मयतीमध्ये गेल्या होत्या. तेथे एक पॉझिटिव्ह व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आली होती. त्यातील काही लोक पॉझिटिव्ह आले. सदर महिलेला २३ जूनला त्रास सुरू झाला. सुरवातीला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केली. समाधान कारक उपचार झाला नाही म्हणून शहरातील एका खाजगी डॉक्टर कडे उपचार चालू होते. त्यांनी उपचार केले होते. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्याने. पुढील उपचारासाठी २५ जूनला सुरत येथील मैत्रेय हाॅस्पीटल मध्ये तपासणीसाठी पाठवले. तेथे City Scan केले त्यात न्यूमोनिया असल्यामुळे त्यांना suspected positive सांगितले होते. २५ जूनला नवापूर शहरात सदर महिला कोरोना बाधित असल्याची अफवा पसरली, मात्र नवापूर प्रशासनाने त्यांना सुरत येथून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात swab साठी पाठवले. त्यांना सिव्हीलला दाखल केले. त्यांचा स्वाब तिसऱ्या दिवशी घेतला. धुळे येथील तपासणी लॅब बंद पडल्याने आज पुण्याहून अहवाल पॉझिटिव्ह आला. या प्रक्रियेला तब्बल नऊ दिवस आणि सुरवातीचे पाच असे आज चौदा दिवस पसार झाले. 

२० ते २५ जून या कालावधीत सदर महिलेच्या कुटुंबातील मोठा मुलगा भाजीपालाच्या लिलावात सहभागी झाला आहे. सदर व्यक्ती च्या संपर्कात किती जण आले त्याचा शोध घेणे, सदर महिलेला सुरवातीला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात कोणी तपासणी केली, नंतर शहरातील खाजगी डॉक्टराणे तपासून उपचार केले, सदर डॉक्टर हे गुजरात राज्यात वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांनी या दहा ते बारा दिवसांत नवापूरला किती रुग्णांवर उपचार केले, त्यांच्या सोबत किती परिवार, यात सदर डॉक्टराने आपल्या गुजरात राज्यातील दवाखान्यात किती जणांची तपासणी केली, किती जण संपर्कात आले याची तपासणी करणे म्हणजे प्रशासनाची तारेवरची कसरत आहे. सदर डॉक्टर नवापूर शहरात वास्तव्यास आहेत तो भाग देखील कंटेन्मेंट झोन केला पाहिजे. 

Advertisement
0