आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा पावसाळ्यापासून गिरणा धरणातून सुरू असलेला विसर्ग शनिवारी सकाळी थांबवण्यात आला. धरणाच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच यंदा तब्बल १४० दिवस धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यात सुमारे ४० हजार दलघफु विसर्ग झाला. म्हणजे गिरणा धरणाच्या क्षमतेचे आणखी दोन धरणे या पाण्याच्या विसर्गाने भरली असती. जळगाव जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या महाकाय गिरणा धरणाचा यंदा हा महाविक्रमच ठरला आहे.
गिरणा धरणाचे १९५९मध्ये बांधकाम सुरू झाले तर १९६९मध्ये बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून इतिहासात ५५ वर्षात पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे जुलैमध्ये उघडण्याची वेळ यंदा पहिल्यांदा आली. गिरणा धरणातून १६ जुलैपासून विसर्ग सुरू होता. १ ते २ दरवाजे उघडण्यापासून सहा दरवाजे सुमारे १ ते ३ फुटाने या काळात उघडण्यात अाले हाेते.
गिरणा धरणाचा असाही रेकॉर्ड धरणातून १६ जुलैला दुपारपासून विसर्ग सुरू होता, तो शनिवारी थांबवण्यात आला. या काळात ४० हजार दलघफू पाणी गिरणा नदीपात्रात साेडले अाहे. या पाण्याचे प्रमाण धरण साठ्याच्या दोन पट अाहे, हा एक रेकॉर्ड अाहे. हेमंत पाटील उपअभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, चाळीसगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.