आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात सत्तांतर झाल्यानंतर विकास कामांचा निधी खर्चास स्थगिती मिळाली हाेती. त्यानंतर अखर्चित निधी परत करण्यासाठी तगादा सुरू झाला. त्यात केलेल्या कामाच्या बिलांची शाश्वती न मिळाल्याने अनेक विकास कामांवर परिणाम झाला. महार्गावरील पथदिव्यांसाठी मिळालेला दीड काेटींचा निधी परत गेला. त्यामुळे दिवाळीत काम पूर्ण हाेऊ न शकल्याने महामार्गावरील अंधार कायम आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६) वरील कालिंकामाता चाैकापासून ते खाेटेनगर चाैकापर्यंतच्या रस्त्यावर नवीन पाेल उभारून प्रकाश व्यवस्था करण्यासाठी डीपीसीमधून ३ काेटी ६ लाख ३४ हजार ९०३ रूपयांचा निधी मंजूर केला हाेता. त्यासाठी १६ जुलै २०२१ राेजी १ काेटी ५३ लाख रूपये निधी वितरीत केला हाेता. परंतु, निविदा प्रक्रियेला सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लाेटला. ३० मार्च २०२२ राेजी कार्यादेश दिल्यानंतर पुणे येथील कंपनीने कामाला सुरूवात केली. कालिंकामाता चाैक ते शिवकाॅलनीपर्यंत पाेलची उभारणी झाली आहे. परंतु, दाेन महिन्यांपासून कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे महामार्गावरून हाेणारी वाहतूक अंधारातच सुरू असल्याने अपघाताचा धाेका वाढला आहे.
निधी परत गेल्याने काम थांबले आहे राज्यात सत्ता बदलानंतर निधी खर्चाला स्थगिती हाेती. ती उठवण्यास तीन महिने लाेटले. त्या पाठाेपाठ डीपीसीकडून प्राप्त परंतु अखर्चीत निधी वळता करण्यात आला. त्यामुळे मक्तेदाराने केलेल्या कामाचा माेबदला मिळेल की नाही या आर्थिक विवंचनेत काम बंद केले आहे.
१२० पाेल उभारावे लागणार महार्गावरील अंडरपासची संख्या वाढल्याने शिवकाॅलनी ते खाेटेनगर दरम्यान तसेच अंडरपासवरील विद्युत पाेलची संख्या वाढली. आतापर्यंत १२० पेक्षा जास्त पाेल उभारले असून आणखी १२० पाेल उभारावे लागणार आहेत. अंडरपासच्या दाेन्ही बाजूने पाेल बसवले जाणार आहेत. महामार्गावर १३ ठिकाणी आडवे बाेअर करून विद्युत केबल टाकाव्या लागणार आहेत. हे काम अवघ्या महिनाभराचे आहे. परंतु मक्तेदाराला जाेपर्यंत पेमेंट मिळत नाही ताेपर्यंत काम सुरू करणार नसल्याचे सांगीतले जाते आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.