आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्ण:उष्ण वाऱ्याने लाट तीव्र, तापमान 43.5 अंशांवर; जिल्ह्यात ताशी 25 किलोमीटर वेगाने वाहिले वारे

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गुरुवारी ताशी २५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तापमान दोन अंशांनी घसरून ४३.५ अंशांवर आले. परंतु, उष्णतेच्या लाटेची तीव्रता तेवढीच जाणवत होती. असनी चक्रीवादळाच्या प्रभावाने वाऱ्याचा वेग आणि दिशा सतत बदलत आहे.

गुरुवारी पहाटेपासून जिल्ह्यात वाऱ्याचा वेग सरासरी २५ किमीपर्यंत वाढला तर वाऱ्याची दिशा मात्र सतत बदलत आहे. गुरुवारी तापमान ४३.५ अंशांवर होते. रात्रीचा पारा ३० अंशांवर स्थिर असल्याने दिवसासोबतच रात्रीचा उकाडा असह्य करणारा ठरत आहे.

दुपारी ३ वाजेनंतर आकाश ६० टक्क्यापर्यंत ढगाळ राहत असून उष्णतेच्या तीव्रतेत आणखी वाढ होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दोन दिवस ढगाळ स्थिती कायम राहील, अशी शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...