आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकार्पण:महामार्ग आज सायंकाळपासून उजळणार‎

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून जाणाऱ्या‎ महामार्गावर दाेन टप्प्यात पथदिव्यांचे काम‎ सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कालिंकामाता‎ मंदिर ते आकाशवाणी चाैकापर्यंतचे काम‎ पूर्ण हाेऊन तीन महिने लाेटले गेले. मात्र,‎ राजकीय वादामुळे लाेकार्पण लांबणीवर‎ पडले हाेते. ‘दिव्य मराठी’त वृत्त प्रसिद्ध‎ झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी शनिवारी‎ लाेकार्पण करणार असल्याचे जाहीर केले‎ हाेते.

त्यानुसार हा कार्यक्रम हाेणार हाेता.‎ मात्र, जळगाव ग्रामीण मतरदारसंघातील‎ इरत भागात आयाेजित केलेल्या‎ कार्यक्रमांमुळे उशीर हाेणार असल्याने‎ त्यांनी हा कार्यक्रम एक दिवस पुढे‎ ढकलला. आता रविवारी सायंकाळी ७‎ वाजता शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील‎ आकाशवाणी चाैकात पथदिवे‎ लाेकार्पणाचा कार्यक्रम हाेईल. महापाैर‎ जयश्री महाजन यांनी पालकमंत्री‎ गुलाबराव पाटील यांच्याशी शनिवारी‎ संपर्क साधल्यानंतर हा निर्णय घेण्यात‎ आला. त्यानुसार आता रविवारी‎ सायंकाळपासून शहरातील महामार्ग‎ उजळणार आहे. त्यामुळे गेल्या तीन ते‎ साडेतीन महिन्यांपासून अंधाराचा सामना‎ करणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांना‎ आता दिलासा मिळणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...