आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआव्हाणे गावातून बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांच्या पंटरांनी रेस्टारंटमध्ये दारू पिऊ दिली नाही म्हणून हाॅटेल मालकांसह तिघांना मारहाण केली. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या पंटरांना हाॅटेलमध्ये डांबून धाे-धाे धुतले. रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता ही घटना आव्हाणे फाट्यावर घडली.
आव्हाणे फाट्यावर सात ते आठ महिन्यांपूर्वी नव्याने किरण छगन पाटील (वय ३५) यांनी माऊली नावाचे रेस्टाॅरंट सुरू केले आहे. सायंकाळी ५ वाजता या गावातून अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने, पाेलिस व शासकीय यंत्रणेवर लक्ष ठेवून त्याची खबर पाेहाेचवणाऱ्या पंटरांचे आठ जणांचे टाेळके या रेस्टाॅरंटमध्ये आले. त्यांनी नाष्ट्याची ऑर्डर देऊन साेबत आणलेल्या दारुच्या बाटल्या बाहेर काढल्या. हाॅटेल मालक किरण याने येथे फॅमिली येतात. दारू पिता येणार नाही, असे सांगितले. त्याचा राग येऊन एका पंटरने जवळ असलेली वीट उचलून किरण याच्या डाेक्यात मारली. त्यासाेबत इतरांनीही मारहाण सुरू केली. हाॅटेलमध्ये स्वयंपाकी व वेटरने अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही या टाेळक्याने मारहाण करून ताेडफाेड केली.
...अन् पंटरांची केली ग्रामस्थांनी यथेच्छ धुलाई मारहाणीतून बचावलेला वेटर पळत फाट्यावर गेला. जळगावहून आव्हाणे येथे परत येणारे रवींद्र पाटील याला या घटनेची माहिती दिली. त्याने गावकऱ्यांना फाेनवरून याची माहिती दिली. त्यानंतर आठ-दहा तरुण घटनास्थळी आले. त्यांनी पंटरांना आवरण्याचा प्रयत्न केला. पण, पाच पंटर पळून गेले. यानंतर सापडलेल्या तीन पंटरांची ग्रामस्थांची यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर पाेलिस घटनास्थळी पाेहाेचले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.