आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवर्षी 1200 पेक्षा अधिक महिलांना गर्भाशय मुखाचा कॅन्सर!:1 हजार मुलींना विनामुल्य देणार कर्करोगाला प्रतिबंध करणारी एचपीव्ही लस

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांना हाेणाऱ्या कॅन्सरमध्ये स्तनाच्या कॅन्सर पाठाेपाठ गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा क्रमांक लागताे. जिल्ह्यात बाराशेहून अधिक महिलांना हा कर्करोग होतो अशी माहिती डाॅ. निलेश चांडक यांनी दिली. या आजाराचा प्रतिबंध करणारी HPV (ह्युमन पॅपीलाेमा व्हायरस) ही लस शहरातील एक हजार मुलींना विनामुल्य देण्यात असल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रमुख शिरीष सिसाेदिया यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.

7 आणि 8 जुलैला देणार लस

लायन्स क्लब जळगाव सेंट्रल, कॅन्सर पेशंट एड असाेसिएशन (सीपीएए) आणि जिल्हा सामान्य रुग्णालय व चांडक कॅन्सर हाॅस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 7 आणि 8 जुलैला शिबीरात ही लस दिली जाणार आहे.

लसीचे बाजारमुल्य चार हजार रुपये

या लसीचे बाजारमुल्य साडेतीन ते चार हजार रुपये असून ती एकदाच घेतली तरी या प्रकारचा कॅन्सर भविष्यात हाेण्यास प्रतिबंध हाेताे. या शिबीरात 10 ते 18 वयाेगटातील लग्न न झालेल्या मुलींना ही लस दिली जाणार आहे.

चारशे विद्यार्थींनीचे यादी तयार

सीपीएए या कॅन्सर रुग्णांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या पुढाकाराने राज्यात यापूर्वी मुंबई व चिखली या दाेन ठिकाणी ही लसीकरण माेहिम राबविण्यात आली असून तिसरे जळगावात हाेत आहे. लायन्स क्लबच्या वतीने शहरातील आठ शाळांमध्ये जावून पालकसभेच्या माध्यमातून माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडून फाॅर्म भरून घेण्यात येत आहे. आतापर्यंत 400 विद्यार्थींनी लस घेण्याचे निश्चित केले असल्याचे सिसाेदिया यांनी यावेळी सांगितले.

तीन ठिकाणी फाॅर्म मिळणार

या लसीकरण शिबीरात लस घेण्यासाठी फाॅर्म भरून देणे आवश्यक असून हे फाॅर्म राका टायर हाऊस, चित्रा चाैक, भंडारी मेडिकल्स, काँग्रेस भवनाच्या समाेर व लक्ष्मी झेराॅक्स तिरुपती हाॅटेलच्या मागे व सुराणा मेडिकल्स भास्कर मार्केट येथे संपर्क साधता येणार आहे. लसीकरण हे चांडक हाॅस्पिटल येथे हाेणार असून शाळांनी 50 च्या गटाची नाेंदणी केल्यास क्लबतर्फे बसची व्यवस्था केली जाईल,असे यावेळी सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...