आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चक्रीवादळाचा थैमान:घरांचे छत 25-30 फूट हवेत उडाले, भिंती कोसळल्या; सहा कुटुंब उघड्यावर

नवापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवापुर तालुक्यातील सोनपाडा गावात चक्रीवादळ

नवापूर तालुक्यातील सोनपाडा गावात चार वाजेच्या सुमारास एका चक्रीवादळाने सहा घरांची छते उडवली. या घटनेत त्या घरांचे मोठे नुकसान झाले. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील सोनपाडा येथे दुपारी एक चक्रीवादळ निर्माण झाले. या वादळामुळे परिसरातील घरांची छत, पत्रे तब्बल 25 ते 30 फूट हवेत उडाले. तसेच, सिमेंटच्या भिंतीदेखील कोसळून पडल्या. यात आदिवासी समाजातील ग्रामस्थांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाईची मागणी स्थानिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...