आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:पत्नीच्या बनावट स्वाक्षऱ्या करून पतीने प्लॅट विक्रीत केली फसवणूक

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्लॉट विक्रीचा व्यवहार रद्द करण्यासाठी पत्नीने पॉवर ऑफ अॅटर्नी दिलेली नसताना तिची बनावट स्वाक्षरी करुन पतीने खोटे स्टॅम्पपेपर बनवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.

पूनम अभिषेक शर्मा (वय ३२, रा. नेहरुनगर) ह्या बंगळुरू येथे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. २०१५ मध्ये त्यांचा विवाह अभिषेक सुनील शर्मा (वय ३२, रा. आदर्शनगर) यांच्याशी झाला आहे. अभिषेक कर्नाटकात नोकरी करतात. ऑक्टोबर २०१९ मध्ये बंगळुरू येथे ७९ लाख ३२ हजार रुपये किमतीचा फ्लॅट बुक केला. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी आठप्रमाणे १६ लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले. हा फ्लॅट दोघांच्या नावे रजिस्टर केला होता. याचदरम्यान पती-पत्नीचा वाद झाल्याने पूनम शर्मा सध्या माहेरी राहत आहेत. तर अभिषेक शर्मा यांनी फ्लॅटचा व्यवहार रद्द करण्यासाठी पत्नी पूनम शर्मा यांना न सांगता पाॅवर ऑफ अॅटर्नीसाठी ५०० रुपये स्टॅम्प पेपरवर त्यांची बनावट स्वाक्षरी केली. या बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून त्यांनी फ्लॅट खरेदीचा सौदा रद्द केला. तसेच बँकेचे लोन रद्द केले. यानंतर पूनम शर्मा यांना चार लाख रुपये परत केले. दरम्यान बँकेशी संपर्क केल्यानंतर आपली बनावट स्वाक्षरी पतीने केल्याचे पूनम यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पूनम यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचे पती अभिषेक शर्मा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...