आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संविधान जनजागृती:भारतीय संविधान हीच आदर्श लाेकशाहीची खरी ओळख हाेय; किशाेर मेढेंचे मत

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक स्तरावर भारतीय संविधान हीच लाेकशाहीची खरी आेळख आहे. ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे, असे अनुसूचित जाती-जमाती आयोग सदस्य किशोर मेढे म्हणाले. मुकेश कुरीर या तरुणाने ५ ते २३ नोव्हेंबर दरम्यान जळगाव ते दिल्ली भारतीय संविधान जनजागृती सायकल रॅलीला शनिवारी सुरुवात केली. यानिमित्त आयाेजित एका कार्यक्रमात मेढे हे बाेलत हाेते. मुकुंद सपकाळे यांनी भारतीय लोकशाही व नागरिकांची सुरक्षितता ही भारतीय संविधानामुळेच आहे. त्यामुळे भारतीय संविधानाबद्दलची जागरूकता प्रत्येक नागरिकांत येणे काळाची गरज आहे.

संविधानातील मूलतत्त्वे नागरिकांनी अंगीकारावे असे नमूद केले. तसेच २६ नाेव्हेंबर राेजी काढण्यात येणाऱ्या संविधान गौरव रॅलीच्या संदर्भात माहिती दिली. मुकेश कुरीर यांनी संविधान सायकल रॅलीच्या संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी केले.

बापूराव पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले. रमेश सोनवणे यांनी आभार मानले. अतिथींचे स्वागत संदीप ढंढोरे, अमोल कोल्हे, वाल्मीक सपकाळे, दिलीप सपकाळे, हरिश्चंद्र सोनवणे, अनिल सुरडकर यांनी केले. अनंत भवरे, सुनील सोनवणे, महेंद्र केदारे, मुकेश बिऱ्हाडे, हेमंत बिऱ्हाडे उपस्थित होते. संविधान गौरव सायकल रॅलीचा समाराेप जळगाव, खंडवा, महू, सागर, छमरपूर, हमीदपूर, कानपूर, लखनऊ, सीतापूर, बरेली, मुरादाबाद, गाजियाबाद मार्गे दिल्ली येथे हाेईल.

बातम्या आणखी आहेत...