आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:पोलिस ठाण्यात हा उपक्रम यशस्वी; पोलिस मुख्यालयाच्या आवारात पाळणाघर पुन्हा सुरू होणार

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस मुख्यालयाच्या आवारात गेल्या आठवड्यात महिला साहाय्य कक्षाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले आहे. याच इमारतीच्या शेजारी आता लहान मुलांसाठी बगिचा तयार करण्यात येणार आहे. तर कोरोना काळापासून बंद असलेले पाळणाघरही सुरू करण्याचे नियोजन झाले आहे. दरम्यान, मुंबईतील काही पोलिस अधीक्षक कार्यालय, पोलिस ठाण्यात हा उपक्रम यशस्वी झाला आहे. त्याच धर्तीवर जळगावातही नियोजन करण्यात आले आहे.

कळंबोलीतील नवीन पोलिस मुख्यालयात राज्यातील पहिलेच पाळणाघर तयार केले आहे. यानंतर नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पाळणाघरे सुरू केली जाणार आहेत. जळगावच्या मुख्यालयात २७ मे रोजी महिला साहाय्य कक्षाच्या अद्ययावत नूतन वास्तूचे उद्घाटन झाले. यात तीन खोल्या आहे.

बातम्या आणखी आहेत...