आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती‎:चौकशी विभाग नियोजित वेळेतही असतो बंदच; प्रवाशांना मिळत नाही बसेसची माहिती‎

पारोळा‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बसस्थानक सध्या समस्यांचे‎ आगार बनले आहे. नागरी सुविधा व ‎स्वच्छतेकडे आगार प्रमुखांचे दुर्लक्ष‎ झाल्याने प्रवाशांची गैरसोय कायम आहे.‎ दोन महिन्यांपुर्वी बसस्थानकात युवकावर ‎ ‎ प्राणघातक हल्ला झाला होता. या घटनेतील ‎जखमीचा नंतर मृत्यू झाला. वॉचमन‎ नसल्याने रात्री बसस्थानकात टवाळखोर व‎ मद्यपींचा वावर असतो. बस चुकल्यामुळे‎ अडकलेले प्रवासी रात्री बसस्थानकात‎ झोपतात. अशा प्रवाशांचे साहित्य चोरी‎ होते. पारोळा बसस्थानकावर अमळनेर‎ विभाग प्रमुखांनी वाहतूक निरीक्षकांची‎ नेमणुक केली आहे.

वाहतूक निरीक्षकांची‎ वेळ सकाळी ५:३० ते रात्री ९:३० पर्यंत‎ असते. मात्र, पारोळा बसस्थानकावर‎ चौकशी विभाग सकाळी ७ पर्यंत व‎सायंकाळी ७ नंतर बंद असतो. त्यामुळे लांबपल्ल्याच्या बसेसची माहिती मिळत‎ नाही. बस स्थानकप्रमुख नसल्याने येथील ‎ ‎ कार्यालयाच्या चाव्या खासगी व्यक्ती‎ असतात. बसस्थानकावर रोडरोमिओ, ‎टवाळखोर आणि पाकीटमारांना अटकाव करण्यासाठी पोलिसाची नियुक्ती आहे.‎ मात्र, पोलिस कर्मचारी हजर राहत नाहीत.‎ बस स्थानकात मोठमोठे खड्डे पडले आहेत.‎ त्यामुळे पावसाळ्यात आवारात चिखल‎ होतो. तसेच खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी‎ प्रवाशांच्या अंगावर उडते. चिखलातून वाट‎ काढताना प्रवाशांची गैरसोय होते.

सकाळी‎ ७.३० वाजेपर्यंत बसस्थानकात स्वच्छता‎ केली जात नाही. सकाळी ७ वाजेचे बसस्थानकातील चित्र.‎ संबंधितांना सूचना देऊ‎ पारोळा बस स्थानकातील खड्यांबाबत‎ वरिष्ठ स्तरावर माहिती दिली आहे. तसेच‎ कार्यालयीन वेळेचे बंधन पाळले जाईल.‎ यासंदर्भात संबंधितांना सूचना दिली जाईल.‎ अर्चना भदाणे, आगार प्रमुख, अमळनेर विभाग‎

बातम्या आणखी आहेत...