आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीनंतर उद्धव सेनेचाही आंदोलनाला पाठिंबा‎:हिताचीच्या कामगारांचा प्रश्न 2‎ दिवसांत सोडवणार - पालकमंत्री‎ गुलाबराव पाटील

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांभोरी येथे सुरु असलेल्या कंत्राटी कामगारांची गुरुवारी उद्धव सेनेचे सह‎ संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी भेट घेतली. या‎ वेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाला पाठिंबा दिला. भूमिपुत्रांना‎ कंपनीत नोकरी द्यावी. कायम कामगारांच्या तुलनेत कंत्राटी कामगारांना कमी‎ पगार देण्यात येत आहे. कामगारांबाबतच्या निर्णय प्रक्रियेत संघटनेला‎ सहभागी करून घेतले जात नसल्याचे आरोप कंत्राटी कामगारांनी केले आहे.‎

पाळधी‎ धरणगाव तालुक्यातील बांभोरी‎ येथिल ‘हिताची’ कंपनीत सुरू ‎असलेल्या संपस्थळी पालकमंत्री ‎ ‎ गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन हा ‎प्रश्न येत्या दोन दिवसांत सोडवणार ‎असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.‎ हिताची अस्टिमो ब्रेक कंपनी ‎कामगारांनी संप पुकारला असून‎ आज संपाचा तिसरा दिवस होता.‎ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी‎ गुरुवारी त्यांची तेथे भेट घेतली व‎ चर्चा केली. या विषयात राजकारण‎ होत असल्याचा आरोप त्यांनी केला.‎ आपण स्वतः कंपनी प्रशासनाशी‎ बोलून यातून मार्ग काढू. या वेळी‎ कोणावरही अन्याय होणार नाही,‎ अशी ग्वाही देत त्यांनी‎ फोनवरुन कंपनी प्रशासनाशी‎ चर्चा केली.

त्यांच्या सोबत‎ मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख‎ मुकुंद नन्नवरे, बांभोरीचे सरपंच‎ सचिन बिऱ्हाडे, अनिल नन्नवरे,‎ ईश्वर नन्नवरे, रवींद्र नन्नवरे,‎ शांताराम महाराज व इतर‎ पदाधिकारी आदी उपस्थित होते.‎