आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांचा गाेंधळ:कुरंगी बस दीड तास उशिरा साेडली; प्रवाशांचा गाेंधळ

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव येथून दरराेज कुरंगी येथे मुक्कामी जाणाऱ्या बसला गुरुवारी सायंकाळी दीड तास उशीर झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. बससाठी वाहक व चालकांची नेमणूक नसल्याने हा गाेंधळ उडाल्याचे सांगण्यात आले.

अखेर प्रशासनाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याने दीड तास विलंबाने बस सुटली. जळगाव येथून शिरसाेली, म्हसावद, बाेरनार, दहिगावमार्गे कुरंगी बस दरराेज सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास जाते. परंतु, गुरुवारी बससाठी वाहक नसल्याने माेठी अडचण झाली. दीड तास विलंब झाल्याने प्रवासी ताटकळले हाेते. प्रवाशांनी गाेंधळ सुरू केल्यानंतर वाहकाची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे रात्री ८.३० वाजता ही बस मार्गस्थ झाली.

बातम्या आणखी आहेत...