आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाणसाने कितीही कमावले तरी त्याचे शेवटचे आसन स्मशान हेच असते. त्यामुळे जीवनात चांगले कर्म करा, असे प्रतिपादन देवदत्त मोरदे महाराज यांनी केले. श्री सूर्यकिरण फाउंडेशनतर्फे द्वारकानगरात १ जानेवारीपासून संगीतमय शिवमहापुराण सप्ताह सुरू झाला आहे. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता देवदत्त मोरदे महाराज यांनी कथेत सांगितले की, जन्म-मृत्यू सर्वांना सारखा आहे.
तेथे कोणीही लहान-मोठा नाही, असे सांगितले. सप्ताहाचे आयाेजन श्री सूर्यकिरण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत धांडे यांनी केले. फाउंडेशनचे सुहास पाटील, विजय पवार, भास्कर राणे हे करीत आहे. मंगळवारी दुपारी २ वाजता कथा हाेणार आहे.
७ राेजी ग्रंथाची शोभायात्रा
संगीतमय शिवमहापुराण सप्ताहात ७ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता द्वारकानगरातून ग्रंथाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ८ रोजी सकाळी ९ वाजता देवदत्त मोरदे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप होऊन शिवमहापुराण सप्ताहाची सांगता हाेणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.