आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्या पाठ्यपुस्तकांतून इयत्ता दहावीचा अभ्यास केला जातो त्या पुस्तकांतील इंग्रजीच्या धड्यांची नावे तर माहिती आहेत, पण त्यांच्या लेखकांची नावे तब्बल ८५ टक्के विद्यार्थ्यांना माहितीच नाहीत. संस्कृत पुस्तकातील तर धड्यांची नावेही ४० टक्के विद्यार्थ्यांना नीट माहिती नाहीत, असा निष्कर्ष एका आगळ्या वेगळ्या परीक्षेनंतर समोर आला. या मुलांना पाठ्यपुस्तकांतून अभ्यास करायची सवय लागावी म्हणून ही परीक्षा घेतली.
नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या शहरातील ए.टी. झांबरे शाळेतच हा उपक्रमही राबवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक पुस्तकांतून तयार उत्तरे पाठ करण्याऐवजी पाठ्यपुस्तके बारकाईने वाचावीत आणि त्यातील माहिती लक्षात ठेवण्याची सवय लावून घ्यावी म्हणून शाळेचे प्रयत्न सुरू आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून मुलांच्या वाचन सवयी जाणून घेण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा घेण्यात आली. दीडशे विद्यार्थी त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मराठी, इंग्रजी, संस्कृत, इतिहास, भूगोल, गणित १आणि २, विज्ञान १ आणि २ अशा नऊ विषयांची ही परीक्षा होती. त्यात या विषयांच्या धड्यांची नावे आणि त्याचे लेखक विद्यार्थ्यांनी लिहायचे होते. सुमारे ११९ धड्यांची नावे विद्यार्थ्यांनी यावेळी लिहिली. मात्र, लेखकांची नावे आठवण्यात त्यांना फारसे यश आले नाही हे विशेष हाेय.
असा निघाला निष्कर्ष
मराठीचे ८० टक्के धडे तर ४० टक्के लेखक विद्यार्थ्यांना माहीत आहे. इंग्रजी विषयाचे ४५ टक्के धडे तर १५ टक्केच लेखक विद्यार्थ्यांना माहीत आहे. संस्कृत विषयात ४० टक्के मुलांना धड्यांची नावे देखील नीट लिहिता आली नाही. गणित १ व गणित २ विषयात मात्र ६० टक्के मुलांना व्यवस्थित उत्तरे लिहिता आली. विज्ञान १ व विज्ञान २ विषयात तर आणखीनच प्रगती दिसून आली तब्बल ७५ टक्के विद्यार्थ्यांना याचे ज्ञान होते. शिकवणी व सततच्या सरावाने या दोन विषयात विद्यार्थी पुढे राहिले. तर इतिहास, भूगोलात ७८% विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली.
बझर वाजवणे, चिठ्ठ्या, बादफेरीनुसार उत्तरे
ही आगळी वेगळी परीक्षा खेळाच्या माध्यमातून घेण्यात आली. त्यासाठी खेळाच्या वेगवेगळ्या फेऱ्या ठेवण्यात आल्या होत्या. बझर वाजवणे, चिठ्ठ्या काढणे, बाद फेरी अशा स्वरूपात विद्यार्थ्यांनी उत्तरे दिल्याने त्यांना आनंदही मिळाला आणि आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे याचे आकलनही त्यांना प्रकर्षाने झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.