आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वाघूरची पातळी बाष्पीभवनाने रोज अर्धा मीटरने होणार कमी, कडक उन्हाळ्याचा परिणाम

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदा उन्हाळ्यातही पाणीटंचाईची चिंता नाही, पाणीसाठा पुरेसा

शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणाऱ्या वाघूर धरणातील पाण्याची पातळीत शनिवारी १ मीटर घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शहरात नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या शेवटच्या पावसाने धरणाची पातळी २३४.१०० मीटर होऊन धरण ओव्हर फ्लो झाले होते. त्याची पातळी घसरून २३३.१०० झाली आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागातर्फे जळगाव महापालिकेसाठी आगामी दोन वर्ष पुरेल एवढा जलसाठा राखीव असल्याने शहरवासीयांना चिंता करण्याचे कारण नाही.

जळगाव शहराला उमाळा गावा जवळील वाघूर धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. त्यात गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो होऊन वाहिले. त्यामुळे नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये धरणाच्या पाण्याची पातळी २३४.१०० ही उच्चतम नोंदवली गेली होती. पावसाळ्यानंतरच्या हिवाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण नगण्य असल्याने तसेच सर्वत्र मुबलक पाऊस झाल्याने जामनेर तालुक्यातील शेतीसाठीही पाण्याची फारशी मागणी नव्हती. त्यामुळे पाण्याची पातळीत फारशी घसरण झाली नाही; परंतु आता उन्हाळा कडक जाणवू लागला असल्याने पाणीपातळीत घसरण होते आहे.

पाणीसाठा पुरेसा म्हणून अपव्यय करणेही योग्य नाही
उन्हाळ्यात धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. त्यामुळे पाण्याची पातळी खाली खाली जाते. प्रत्येक दिवसाला धरणाची पातळी ०.५० मीटर अर्थात अर्धा मीटरने खाली जाते. मात्र, असे असले तरी धरणातील सध्याचा उपलब्ध जलसाठा लक्षात घेता आगामी दोन वर्षे तरी जळगाव शहराला पाणीटंचाईची भीती नाही, असे चित्र समोर येते आहे. दरम्यान, पुरेसा पाणीसाठा असला तरी त्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी शहरातील प्रत्येक नागरिकाला आवर्जून घ्यावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...