आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळून जाणाऱ्यांचे आयुष्य पूर्णपणे उद्धस्त:क्षणिक आकर्षणातून आयुष्य खराब करून घेऊ नका; किशोरवयीनांना एसपींचे आवाहन

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्षणिक आकर्षणातून किशोरवयीन मुले कुटुंबीयांना अंधारात ठेऊन पळून जात असल्याच्या घटना जिल्ह्यात वाढत आहेत. वर्षाकाठी सुमारे 250 गुन्हे जिल्ह्यात दाखल होत आहेत. या संदर्भात पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून पालक, मुलांना भावनीक आवाहन केले आहे.

डॉ. मुंढे यांनी सांगीतल्यानुसार, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले किशोरवयीन मुले व मुली क्षणिक आकर्षणातून एकमेकांच्या संपर्कात येतात. प्रेमात पडतात. ही मुले कोणताही विचार न करता कुटुंबीयांना अंधारात ठेऊन घरातून पलायन करतात. या संदर्भात वर्षाकाठी सुमारे 250 गुन्हे जिल्ह्यात दाखल होत आहेत. मुले निघुन गेल्यानंतर कुटुंबीयांना प्रंचड त्रास सहन करावा लागतो. त्यांचे जगणे कठीण होते. हताष झालेले पालक आत्महत्या करण्याचा देखील विचार करतात. त्यामुळे मुलांनी या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. दुसरीकडे पळुन गेलेल्या किशोरवयीन मुलांचा शोध पोलिसांनी घेतलेल्यानंतर मुलांवर अपहरण, अत्याचार, बालकांचे लैंगीक शोषण कायद्याच्या कलमांनुसार गंभीर गुन्हे दाखल होतात. यामुळे त्यांचे पुढील आयुष्य पूर्णपणे उध्वस्त होते. पासपोर्ट, नोकरी मिळत नाही. क्षणिक आकर्षणामुळे मुलांना आयुष्यभराचा त्रास होतो. यामुळे मुले-मुलींनी या गोष्टीचा विचार करायला हवा. अन्यथा भविष्यात फार मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. असे भावनीक आवाहन डॉ. मुंढे यांनी डॉक्युमेंट्रीमधून केले आहे.

पाल्य-पालकांचा संवाद महत्त्वाचा

वयात येणाऱ्या मुलांच्या भावना पालकांनी समजून घ्याव्या. त्याचप्रमाणे मुलांनी देखील पालकांच्या अपेक्षांचा विचार करावा. आपल्या मनात येणाऱ्या भावना, जीवनात घडणाऱ्या गोष्टी मुलांनी पालकांसोबत शेअर कराव्या. पालकांनी देखील मुलांच्या मनात काय आहे? हे जाणुन घेण्यासाठी त्यांच्याशी मैत्रीपुर्ण संबंध तयार करावे. दोन्ही बाजुंनी संवाद वाढल्यास पुढे येणाऱ्या समस्या थांबतील. यामुळे अप्रिय घटना घडणार नाही. असा संदेश या डॉक्युमेंट्रीमधून देण्यात आला आहे.

आकडे बोलताय परिस्थिती

अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या सुमारे 250 घटना वर्षभरात घडत आहेत. यातील प्रत्येक मुलावर अपहरणाचा गंभीर गुन्हा दाखल होतो. परिणामी त्याचे करीयर पूर्णपणे उध्वस्त होते. हे आकडे कमी करण्यासाठी पालक, मुलांनीच पुढकार घ्यायला हवा. असे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...