आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान बदल:ढगांची माया आटली; तापमान चाळिशीकडे

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देशातून उत्तरेकडे मान्सूनची आगेकूच होत असताना जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. पावसासाेबत ढगांचीही माया आटल्याने जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमान वाढत आहे. गुरुवारी जिल्ह्यात ३९.८ एवढ्या उच्चांकी तापमानाची नाेंद करण्यात आली. दिवसा उन्हाचा चटका अधिक प्रखरतेने जाणवत होता.

हवामान विभागाने १३ जून राेजी खान्देशात मान्सून दाखल झाल्याची आनंदाची बातमी दिली होती. दरम्यान, काेरड्या मान्सूनने खान्देशवासीयांची साफ निराशा केली. केवळ मान्सूनच्या आगमनाच्या चर्चेने अनेक शेतकऱ्यांनी खरिपाची केलेली पेरणी आता वाया गेली आहे.

पावसाचा नवीन अंदाज
हवामान विभागाने वर्तवलेल्या नवीन अंदाजानुसार आता येत्या रविवारपासून पावसाचा जाेर वाढणार आहे. तुरळक ठिकाणी जाेरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...