आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:कंपनीची ३३ लाखांत फसवणूक करणाऱ्या व्यवस्थापकास अटक

जळगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सीएमएस’ कंपनीच्या जळगावच्या शाखा व्यवस्थापकाने ३३ लाख २९ हजार १८१ रुपये कंपनी खात्यात जमा न करता गैरवापर केला होता. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात जिल्हापेठ पोलिसांनी या व्यवस्थापकास सोमवारी अटक केली. महेंद्र पांडुरंग झोंबाडे (वय ३४, रा. चाकण, पुणे) असे अटक केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.

नाशिक येथील सीएमएस नावाच्या कंपनीची शाखा आहे. जळगावच्या शाखेत २०१८ मध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून झोंबाडे हा काम पाहत होता. कंपनीचे पुण्यातील वरीष्ठ व्यवस्थापक मुकुंद ओव्हळ यांनी सप्टेंबर २०१९मध्ये कंपनीच्या खात्याची तपासणी करत असताना त्यांना रेल्वेकडील येणाऱ्या रकमेपैकी ३३ लाख २९ हजार १८१ रूपये खात्यात जमा न झाल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी झोंबाडे याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जळगावात येऊन तपासणी केली. झोंबाडे याने फसवणूक, अपहार केल्याची कबुली दिली होती. लवकर सर्व पैसे परत करेल असे आश्वासन देवून स्टॅम्प पेपर आणि नोटरी करून दिली. ठरलेल्या वेळेत पैसे परत न केल्याने ६ फेब्रुवारी २०२० रोजी झोंबाडेच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. पोलिस निरीक्षक अरुण धनावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार, गणेश निकम, फिरोज तडवी यांच्या पथकाने झोंबाडे याला पुण्यातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...