आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमासाठी काय पण:14 वर्षांच्या मुलाची आई फेसबूकवरून 22 वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात, त्याच्यासाठीच सर्व काही सोडून उत्तर प्रदेश आणि त्यानंतर नेपाळ सीमेपर्यंत पोहोचली

जळगाव7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 ऑगस्ट 2019 पासून जळगावातून बेपत्ता होती महिला, आता पती देत आहे घटस्फोट

समाज माध्यमावर एका २२ वर्षीय तरुणासोबत शहरातील ३४ वर्षीय विवाहितेची ओळख निर्माण झाली. त्यातून दोघांचे सूत जुळले. यानंतर पळून जात विवाहिता थेट उत्तर प्रदेशातून नेपाळ बॉर्डरवर पोहोचली. त्या तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय तिने घेतला. कुटुंबीयांसोबत पुन्हा घरी येण्यास नकार दिला. हताश झालेले कुटुंबीय व पोलिस मंगळवारी जळगावात परतले.

जळगाव शहरात राहणारी ही ३४ वर्षीय महिला आहे. तिला १४ वर्षांचा मुलगा आहे. गेल्या वर्षभरापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून महिलेची मैत्री उत्तर प्रदेशातील एका २२ वर्षीय तरुणासोबत झाली. दोघांच्या गप्पा वाढल्यानंतर सूत जुळले. एकमेकांसोबत राहून संसार करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. यानंतर १५ ऑगस्ट २०१९ रोजी या महिलेने जळगाव सोडले. पत्नी हरवल्यामुळे तिच्या पतीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिचा मोबाइल दिल्ली येथे सुरू असल्याची तांत्रिक माहिती पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी मिळवली होती. यानंतर महिलेने मोबाइल बंद केला होता. दरम्यान, नैनितालपासून काही अंतरावर नेपाळ देशाच्या बॉर्डरजवळ एका छोट्या गावात महिला व तरुण आढळले. परंतु विवाहितेने पतीसोबत राहण्यास नकार दिला.

घटस्फोट घेण्याची तयारी

पत्नी परत न आल्यामुळे आता तिच्या पतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नीदेखील याच तयारीत असल्याचे तिने पोलिसांना कळवले आहे. महिलेसोबत असलेला तरुण हा नैनिताल परिसरात खासगी नोकरी करतो, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.

बातम्या आणखी आहेत...