आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • The Maternity Ward Of The District Hospital Should Be Investigated; Statement To The District Collector On Behalf Of The Minority Association |marathi News

निवेदन:जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती विभागाची चौकशी व्हावी; अल्पसंख्याक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना व्यवस्थित सेवा दिली जात नाही. तसेच अपूर्ण सुविधांमुळे महिलांचा मृत्यू होत आहे. ही बाब गंभीर असून या प्रकरणाबाबत चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अल्पसंख्याक सेवा संघातर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या नातेवाइकांकडून अर्ज पूर्ण भरून न घेता त्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. यात अर्जामध्ये दिलेल्या शस्त्रक्रियादेखील केल्या जात नाही. रुग्ण गंभीर झाल्यास औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात रेफर केले जाते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तांबापुरातील संजेदा इम्रान बागवान या महिलेचा सीझरनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यानंतर लगेच मृत्यू झाला. तर सलमा युनूस शेख या महिलेची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात असलेल्या व्यवस्थेची व सदर प्रकरणाबाबत दोषी असणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जहांगीर. ए. खान, याकूब खान, अकबर काकर, तन्वीर शेख उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...