आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात बदल:शहराचे कमाल तापमान‎ सरासरी दाेन अंश वाढले‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेब्रुवारी महिन्यात कमाल आणि‎ किमान तापमानात तब्बल २३.३ अंश‎ सेल्सिअसची तफावत वाढली‎ आहे. साेमवारी कमाल तापमान‎ सरासरी तापमानापेक्षा दाेन अंशाने‎ वाढून ३३.६ अंशांवर गेले हाेते. तर‎ किमान तापमान सरासरीच्या तीन‎ अंशाने घटून १०.३ अंशांवर आले‎ हाेते. कमाल-किमान तापमानातील‎ तफावत वाढल्याने २४ तासांतच‎ उन्ह आणि थंडीचे चक्र सुरू आहे.‎

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा‎ हिवाळ्यात तापमानात अचानकपणे‎ हाेणारे बदल अधिक आहेत. संपूर्ण‎ जानेवारी महिन्यात किमान‎ तापमानाने नीचांकी आणि उच्चांकी‎ पातळीची नाेंद केली आहे. त्यामुळे‎ थंडी आणि उकाडा अशी दुहेरी‎ स्थिती अनुभवता आली. फेब्रुवारी‎ महिन्यात देखील अशीच स्थिती‎ कायम आहे. कमाल तापमान‎ नीचांकी पातळीवर हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...