आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळी‎ साजरी:नवीपेठ मंडळाच्या सदस्यांनी‎ लुटला रंगपंचमीचा आनंद‎‎

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीपेठ महिला मंडळातर्फे रंगोत्सव‎ साजरा केला. या वेळी महिला‎ सदस्यांनी विविध गेम खेळत‎ रंगपंचमीचा आनंद लुटला. नैसर्गिक‎ रंगांसह कोरडे रंग खेळून होळी‎ साजरी केली.

नवीन सभासदांचाही‎ सन्मान करण्यात आला. मंडळाच्या‎ अध्यक्षा कविता जाधव, सचिव‎ नीलकमल टाक यांनी मंडळाच्या‎ विविध उपक्रमांची माहिती दिली.‎ आगामी उपक्रमाच्या‎ नियोजनाबाबतही माहिती दिली. या‎ वेळी मंडळाच्या सदस्य जया वाणी,‎ साधना कोगटा, ऊर्मिला झंवर,‎ वैशाली जोशी, अलका लढ्ढा आदी‎ सहभागी होत्या.‎

बातम्या आणखी आहेत...