आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारठा वाढायला‎ सुरुवात:किमान तापमान दाेन अंशाने घसरले‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरेत सलग येणाऱ्या चक्रवातामुळे‎ वातावरणात बदल झाला आहे. उत्तर‎ भारतात हाेणाऱ्या बर्फवृष्टीमुळे‎ तापमानात घट झाली आहे. एकाच‎ दिवसात किमान तापमान २ अंशाने‎ घसरले आहे. ढगाळ वातावरणामुळे‎ दिवसाचेही तापमान कमी झाले आहे.‎ एकंदर वातावरणातील गारठा वाढायला‎ सुरुवात झाली असून पुढचे तीन दिवस‎ किमान तापमानात अधिक घसरण शक्य‎ आहे.

दरम्यान, मंगळवारी किमान‎ तापमान १६.५ अंश सेल्सिअस हाेते. त्यात‎ बुधवारी दाेन अंशाने घट झाली आहे.‎ किमाल तापमानही २९ अंशांवर आले‎ आहे. गुरुवार ते शनिवार दरम्यान किमान‎ तापमानात आणखी दाेन अंशाने घट‎ शक्य असून, किमान तापमान १२‎ अंशांपर्यंत येण्याचा अंदाज वर्तवला जात‎ आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभर उन्ह‎ सावलीचा खेळ सुरू हाेता.‎

बातम्या आणखी आहेत...