आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरण ढगाळ:किमान तापमान सात अंशाने वाढले

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎रविवारी किमान तापमानात तब्बल‎ ७ अंश सेल्सिअसने वाढ झाली. १६‎ अंशावर असलेले किमान पारा‎ तब्बल २३ अंशाच्या उच्चांकी‎ पातळीवर गेल्याने रात्रीचा गारवा‎ हरवला हाेता. दरम्यान, शनिवारी‎ अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने‎ हजेरी लावली तर जळगाव शहरात‎ रविवारी सकाळी ९ वाजेच्या‎ सुमारास पावसाचा शिडकाव झाला.‎ शनिवारपासून संपुर्ण उत्तर‎ महाराष्ट्रात वातावरण ढगाळ झाले‎ आहे.

शनिवारी सायंकाळी चाेपडा,‎ यावल या सातपुडा डोंगररांगेतील‎ परिसरात अवकाळी पावसाने हजेरी‎ लावली. जिल्ह्यात रविवारी‎ सकाळपासूनच तब्बल ७० टक्के‎ आकाश ढगांनी व्यापले हाेते.‎ सकाळी शहरात काही भागात‎ पावसाचा शिडकाव झाला. ढगाळ‎ वातावरणामुळे रविवारी उन्हाची‎ तीव्रता खुपच कमी झालेली हाेती.‎ हवामान विभागाने वर्तवलेल्या‎ अंदाजानुसार पुढील तीन दिवस‎ राज्यात अवकाळी पावसाची स्थिती‎ कायम राहणार आहे. त्यात विदर्भ‎ आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात‎ तुरळ पावसाची शक्यता आहे.‎

बातम्या आणखी आहेत...