आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभा:नळजोडणी मुद्द्याविषयी मनसे लढा उभारणार; रविवारी सभा

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेतून जुन्या अपार्टमेंटमध्ये एकच नळ जाेडणी देण्याच्या मुद्यावरून मनसेतर्फे एकत्रित लढा उभारला जाणार आहे. १९ जून रोजी सकाळी ११ वाजता पद्मालय विश्रामगृहात जुन्या अपार्टमेंटमधील रहिवाशांची सभा हाेणारआहे. अमृत योजनेतून मनपा जुन्या अपार्टमेंटमधील सर्व रहिवाशांना एकच नळकनेक्शन देण्यावर ठाम आहे.

या नियमाविरुद्ध मनसेतर्फे रहिवाशांना एकत्रित करून लढा उभारला जाणार आहे. त्यासाठी रविवारी सभेचे आयोजन केले आहे. अपार्टमेंटमधील फ्लॅट धारकांच्या संमतीने वेगवेगळे नळ कनेक्शन मिळण्यासाठी रविवारी अर्ज घेऊन येण्याचे मनसेचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी कळवले.

बातम्या आणखी आहेत...