आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेंट्रल बँक कॉलनी, खंडेरावनगर, मयूर कॉलनी, निसर्ग कॉलनी, पिंप्राळ्याच्या काही भागात अनेक ठिकाणी खुल्या भूखंडांवर व खंडेरावनगरालगत असलेल्या रेल्वेलाइन लगतच्या खंड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचून डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच अनेक खुल्या भूखंडांवर गवताचे कुरण पसरले आहे. रेल्वे लाइनलगतच्या डबके व वाढलेले गवत हे रेल्वे हद्दीत असल्याचे कारण सांगून महापालिका कर्मचारी टाळाटाळ करतात. त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रभाग १० मधील पिंप्राळ्याचा काही भाग, मयूर कॉलनी, निसर्ग कॉलनी, सेंट्रल बँक कॉलनी आदी परिसरातील अनेक भागांत खुल्या भूखंडांवर कुरणे वाढली आहेत. या कुरणांमुळे व साचलेल्या डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती वाढून अनेक भागातील ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले आजारी पडत आहेत. हे खड्डे बुजवून व कुरणे साफ करण्याची गरज आहे. तसेच उपनगरातील गल्ली-बोळातील रस्ते, गटारी करण्याला पालिकेने प्राधान्य देणे अपेक्षित आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
दक्षिण पिंप्राळातील अनेक खुल्या भूखंडांत पाणी साचल्याने येथे दलदल पसरून डासांच्या उत्पत्ती वाढ होत आहे. पावसाळ्यात या भूखंडांमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होत आहे. महापालिकेने हे खड्डे बुजवून पाणी साचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रभाग १० मधील खुल्या भूखंडांवरील खड्डे बुजवले तरी डासांच्या उत्पत्तीला अडकाव बसेल.
छोटू नावरकर, सेंट्रल बँक कॉलनी
फवारणी करण्याची गरज
पावसाळ्याचे दिवस असल्याने डबके, नाला व खुल्या भूखंडावरील गवत यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात डास झाले आहेत. घराघरांत एखाद दुसरा सदस्य आजारी आहे; मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांकडून या परिसरात फवारणी करण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या परिसरात नियमित फवारणी करण्याचे नियाेजन करायला हवे.
देवकाबाई क्षीरसागर, निसर्ग कॉलनी
परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांची वाटते भीती
खंडेरावनगर हा परिसर खोलगट भागात वसलेला आहे. जवळच रेल्वेलाइन गेल्याने हा भाग हद्दीच्या वादात अडकला आहे. या परिसरात गवताचे कुरण पसरल्याने येथे सरपटणाऱ्या प्राण्याची सतत भीती असते. गवताच्या कुरणमुळे येथे अनेकदा सरपटणारे प्राणी निघतात. हद्दीचा वादात न अडकता महापालिकेने येथील गवत काढून मोकळे करावे. - रूपाली भुयार, खंडेरावनगर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.