आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरपालिका असताना समाजोपयोगी कार्यासाठी देण्यात आलेल्या आस्वाद चौकातील खुल्या जागेचा पतपेढीसाठी वापर केला जात हाेता. जप्तीच्या कारवाई विरोधात न्यायालयात गेलेल्या संस्थेच्या बाजूने कोणतीही स्थगिती नसल्याने अखेर मनपाने बुधवारी जागा ताब्यात घेत सील ठोकले.
आस्वाद चौकापासून जवळच गुलमोहर कॉलनीतील ओपन स्पेस १९८९-९० मध्ये समाजोपयोगी कार्यासाठी दिली होती. त्या जागेवर नियमापेक्षा जास्त बांधकाम करण्यात आले होते. ले आऊटमधील नागरिकांची जागा असतानाही त्याचा वापर खासगी स्वरूपात सुरू होता. यासंदर्भात २०१२ पासून नागरिकांच्या तक्रारी सुरू होत्या. महापालिकेने तेव्हा देखील जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; परंतु संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, महापालिकेने पुन्हा नव्याने जागा ताब्यात घेण्याची संपूर्ण प्रक्रिया राबवली. त्यात नियमानुसार कलम ८१ ब ची नोटीस बजावली होती.
या जागेसंदर्भात न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नव्हती. त्यामुळे महापालिकेच्या मिळकत विभागाचे व्यवस्थापक नरेंद्र चौधरी व अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर यांच्या पथकांनी जागा ताब्यात घेत सील ठाेकले. यावेळी नगररचना विभागाचे अभियंता जयंत शिरसाठ व कर्मचारी उपस्थित होते. या ओपन स्पेसमधील इमारतीवर दी जळगाव नागरी सहकारी पतपेढी, पाणपोई, सांस्कृतिक उपक्रम केंद्र, क्लब हॉल व वाचनालय असे लिहिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.