आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेहिम:भंगार बाजारातील अतिक्रमण‎ महापालिका आज हटवणार

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ महापालिका आयुक्त पदाचा तिढा दाेन‎ महिन्यांनंतर सुटल्याने आता आयुक्त डाॅ.‎ विद्या गायकवाड अॅक्शन माेडमध्ये आल्या‎ आहेत. पहिल्या दिवशी आसाेदा‎ ग्रामस्थांसाठी शिवाजीनगरातील रस्त्याचा‎ विषय हाताळल्यानंतर मंगळवारी त्यांनी‎ नेरीनाका ते अजिंठा रस्त्यावरील भंगार‎ बाजारातील अतिक्रमण हटाव माेहीम‎ राबवली जाणार असल्याची माहिती दिली‎ आहे. त्यासाठी पाेलिस अधीक्षकांची भेट‎ घेऊन बंदाेबस्ताची मागणी करण्यात आली.‎ शहरातील अजिंठा चौफुलीजवळ‎ असलेल्या भंगार बाजाराजवळ‎ व्यावसायिकांकडून फर्निचर भंगार वाहने व‎ इतर साहित्य रस्त्यावर ठेवल्यामुळे रहदारीस‎ अडथळा होत असल्याने मनपाच्या‎ अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून अतिक्रमण‎ काढण्याची कारवाई करण्यात येणार आहे.‎

मंगळवारी सकाळी १० वाजता हे अतिक्रमण‎ हटवण्यात येणार आहे. त्यासाठी एक पोलिस‎ उपनिरीक्षक, १५ पुरुष पोलिस शिपाई, पाच‎ महिला पोलिस शिपाई असा फौजफाटा‎ उपस्थित राहणार आहे. तसेच‎ महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागात‎ कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने‎ मक्तेदारामार्फत २० मजूर घेतले असून यापुढे‎ पाणी पुरवठा व बांधकाम विभागात देखील‎ मक्तेदाराकडून मजूर उपलब्ध करून घेतले‎ जाणार आहेत. शहरात सार्वजनिक बांधकाम‎ विभागाच्या माध्यमातून ३८ कोटी रुपयांच्या‎ रस्त्यांची कामे केली जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...