आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • The Municipality Has Not Transferred Funds To The Public Works Department; The Work Has Not Started Even After The Order Of The Guardian Minister; Feeling Intense | Marathi News

लाेकभावना:पालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला नाही निधी ; पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही कामाला सुरुवात हाेईना; लाेकभावना तीव्र

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी मंजूर ४२ कोटांच्या निधीतून एक रुपयाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झालेला नाही. आयुक्तांची निवृत्ती आणि लेखाधिकाऱ्यांच्या बदलीच्या प्रक्रियेत पालिकेला निधी वर्ग करण्याचा विसर पडला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली असली तरी आठवडा उलटूनही कामाला सुरुवात नाही.

शहरातील रस्त्यांच्या कामाची चर्चा अधिक असून, प्रत्यक्षात कामांचा पत्ताच नाही. शासनाच्या दोन विभागातील वादात वाढीव खर्चाच्या संदर्भात महिनाभरापासून निर्णय होऊ शकलेला नाही. ४२ कोटीतून ४९ रस्त्यांची कामे करायची परंतु एक रूपयाही प्राप्त नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने कामांना सुरूवात केलेली नाही. महिनाभरापुर्वी पाच कोटींचा निधी वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या परंतु, त्यावर सेवानिवृत्त झालेले आयुक्त सतीश कुलकर्णी व नागपूर येथे बदली झालेले लेखाधिकारी कपिल पवार यांची स्वाक्षरी न झाल्याने फाईल धुळखात पडून आहे. नवीन आयुक्त व लेखाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी हा निधी वर्ग केला जाऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...