आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्यांचा गौरव:जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी ‘फर्टिगेशन’ तंत्रज्ञानाची आवश्यकता

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘दिव्य मराठी’च्या कृषीरत्न पुरस्कार सोहळ्यात डॉ.के.बी.पाटील यांचे प्रतिपादन

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अन्नघटकांची कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला पाहिजे. पिकांना हाताने दिलेल्या खतांद्वारे ५० टक्केच फायदा होतो, तर ‘फर्टिगेशन’ तंत्रज्ञानामुळे ९० टक्क्यापर्यंत परिणामकता वाढविता येते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी फर्टिगेशन तंत्रज्ञान आवश्यक असल्याचे प्रतिपादन जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील यांनी केले. ‘दिव्य मराठी’च्या कृषीरत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार वितरण करण्यात आले. के. बी. पाटील म्हणाले की शेतीमध्ये स्थैर्य येण्यासाठी अचुकतेकडे जावे लागेल. शेतकऱ्यांनी शेती करताना पीकांबाबतच्या रोगराईसह सर्वच नोंदी ठेवणे आवश्यक आहे. वातावरण, बाजारभाव याप्रमाणे पुढे पीकांवरील रोगराईचे अंदाज बांधता आले पाहीजे, त्यासाठी नोंदी घेवून अनुभव वाढवणे आवश्यक आहे. गेल्या ३० वर्षात केळी क्षेत्रात काम करीत असून केळीला फळाचा दर्जा मिळणे ही सर्वात ऐतिहासिक बाब असल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्र्यांना धन्यवाद दिले. या वेळी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांतून उमरे (ता. एरंडोल) येथील शेतकरी समाधान पाटील, अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथील दिनेश पाटील, तांदळवाडी (ता. रावेर) येथील शशांक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वैशाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर दिव्य मराठीचे युनिट हेड संजीव पाटील यांनी आभार मानले.

कृषिरत्न पुरस्कारार्थींसमवेत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जैन इरिगेशन सिस्टिमचे डॉ. के. बी. पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ अनिल ढाके, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे प्रमुख गौतम देसरडा, प्लॅन्टो कृषीतंत्र, पलशर बायो प्रॉडक्टचे संचालक नीखिल चौधरी आदी मान्यवर.

एेतिहासिक बाब असल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्र्यांना धन्यवाद दिले. या वेळी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांतून उमरे (ता. एरंडाेल) येथील शेतकरी समाधान पाटील, अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथील दिनेश पाटील, तांदळवाडी (ता. रावेर) येथील शशांक पाटील यांनी मनाेगत व्यक्त केले. वैशाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर दिव्य मराठीचे युनिट हेड संजीव पाटील यांनी आभार मानले.

या शेतकऱ्यांचा झाला गौरव मल्हार कुंभार (चोरवड, ता. पारोळा), भागवत महाजन (गोरगावले, ता. चोपडा),संजय देशमुख (पहुर, ता. जामनेर), कमलेश पाटील (बाहुटे, ता. पारोळा), अतुल राणे (कुंभारखेडा, ता. रावेर), संघरत्न गायकवाड (विखरण, ता. एरंडोल), दिनेश पाटील (अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर), ज्ञानेश्वर पाटील (गहूखेडा, ता. रावेर), गणेश पाटील (चोरवड, ता. पारोळा), नवनीत पाटील (तालखेडा, ता. मुक्ताईनगर), संदीप पाटील (पारोळा), संदीप माळी (मोरफळ, ता. पारोळा), वैशाली पाटील, (दसनुर, ता. रावेर), सचिन चौधरी (निंभोरा, ता. रावेर), अविनाश पाटील (हनुमंतखेडे, ता. पारोळा), मदनसिंग राजपूत (सावदे, ता. भडगाव), भूषण निकम (उंदीरखेडे), कन्हैय्या महाजन (तांदळवाडी, ता. रावेर), नीलेश पाटील (निंबोल), राजेंद्र शिरसाठ (आव्हाणे), भावेश चौधरी (फैजपूर, ता. यावल), शशांक पाटील (तांदळवाडी, ता. रावेर), नामदेव महाजन (नगरदेवळा, ता.पाचोरा), नितीन चौधरी (भालोद, ता. यावल), नीखिल पाटील (कुंभारखेडा, ता. रावेर), समाधान पाटील (उमरे, ता. एरंडोल), अंबर चौधरी (तांदळवाडी), दीपक पाटील (गोरगावले).

बातम्या आणखी आहेत...