आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुटी‎:नवीन शैक्षणिक सत्र‎ 12 जूनला सुरू हाेणार‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची‎ २०२३ची उन्हाळी सुटी व शैक्षणिक वर्ष २०२३-२४‎ सुरू करण्याबाबत नुकतेच शिक्षण संचालक यांनी‎ पत्र काढले आहे. यंदा २ मे पासून शाळांना सुटी‎ जाहीर करण्यात आली आहे. ११ जूनपर्यंत सुटी‎ राहणार असून, १२ जून रोजी नवीन शैक्षणिक‎ वर्षाला सुरुवात हाेईल. दरम्यान, नवीन सत्रात‎ एकूण सुट्या या ७६ पेक्षा अधिक हाेणार नाहीत‎ याची काळजी घेण्याचे सूचित करण्यात आले.‎ राज्यातील इतर सर्व भागात १२ जून रोजी शाळा‎ सुरू होणार आहेत. विदर्भातील तापमान पाहता या‎ ठिकाणी २६ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय‎ शिक्षण विभागाने घेतला आहे.

दरम्यान, इयत्ता‎ पहिली ते नववी तसेच इयत्ता अकरावीचा निकाल १‎ मेपर्यंत लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.‎ शाळांमधून उन्हाळी व दिवाळीची दीर्घ सुटी कमी‎ करून त्या एेवजी गणेशोत्सव व नाताळ सणाच्या‎ प्रसंगी त्या सुटी समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या‎ शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने घेण्याचे निर्देश‎ देण्यात आले आहेत. माध्यमिक शाळा संहिता‎ नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व‎ प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त‎ होणार नाही याची दक्षता घेण्याचे पत्राद्वारे कळवले‎ आहे. त्या अनुषंगाने नियाेजन केले जाते आहे, असे‎ शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.‎