आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • The Number Of Corona Cases In The State Is Increasing Rapidly; Two Patients Of Corona Were Found In Chopda And Dharangaon City |marathi News

कोरोना:राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय; चोपडा अन‌् धरणगाव शहरात आढळले कोरोनाचे दोन रुग्ण

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच जळगाव जिल्ह्यात देखील दररोज रुग्ण आढळून येत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात पुन्हा नव्याने दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून यात चोपडा व धरणगाव तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, चोपडा शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा पाय पसरवायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

दिवसभरात दोन रुग्ण बरे झाले आहे. सध्या जिल्ह्यात १२ रुग्ण सक्रिय असून सर्व रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. सध्या वातावरणात बदल झाला असून तसेच इतर जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याने ताप, सर्दी, खोकला, अशक्तपणा जाणवत असल्यास त्वरित कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, मागील काहि दिवसांपासून चोपडा तालुक्यात पुन्हा काेरानाचे रुग्ण सापडत असल्याने आराेग्य विभागाची चिंता वाढली आहे. तर धरणगाव तालुक्यातही कोरोना पाय पसरवत असल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...